पुढील आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार, पहा संपूर्ण यादी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । जर तुम्ही या आठवड्यात बँकेशी संबंधित कामांचा निपटारा करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही प्रथम बँकेच्या सुट्ट्यांची यादी पहा. या आठवड्यात ५ दिवस विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. बँकेत जाण्यापूर्वी संपूर्ण यादी पहा.

असे आहेत सुट्ट्या

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरूमध्ये बँका बंद
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम – शिलाँगमध्ये बँका बंद
27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. या दरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतत बंद राहतील. यासोबतच, उद्यापासून देशातील विविध शहरांमध्ये सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज