fbpx

जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढील तीन मुसळधार : हवामान खात्याकडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता गुलाब नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले असून यामुळे महाराष्ट्रात येत्या तीन ते चार दिवसांसाठी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. रविवारी सायंकाळी हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी धडकेल. महत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. वेगाने वारे वाहतील. कोकणात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल.

mi advt

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्या (२७ संप्टेंबर) साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २८ संप्टेंबरसाठी जिल्ह्यात ऑरेंज जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

२७ आणि २८ सप्टेंबरसाठी या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट

२७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
२८ सप्टेंबर रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामानाचा अंदाज
२६ सप्टेंबर :
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

२७ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.

२८ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील.

२९ सप्टेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज