fbpx

मेहंदी सुकण्यापूर्वीच नववधूने रोकड, दागिन्यांसह ठोकली धूम

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ सप्टेंबर २०२१ | लग्न झाल्या झाल्या अवघ्या १० दिवसात नवरी ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील शिंदी उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवरीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षरा मनोज रंधे, सोनाली गोकुळ सोनार, आशा नानासाहेब निकम, गोकुळ रवींद्र सोनार, अशोक वीरसिंग खाडे, गुड्ड्या समाधान शिंपी अशी या ६ जणांची नाव आहेत.

mi advt

या बाबद अधिक माहिती अशी की ,
शिंदी येथील २८ वर्षीय तरुण प्रमोद राजाराम शिंपी या तरुणाचा विश्वास संपादन करून सोनालीसह पाच लोकांनी लग्नासाठी ओळखीचे स्थळ दाखविले. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च करावे लागतील असेही सांगितले. त्यानुसार तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी होकार दिला. ३० ऑगस्ट रोजी अक्षरा रंधे हिच्याशी लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, तरुणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर भुसावळ येथे बहीण-पाहुण्यांना भेटण्यास जाते, असे सांगून घरून नववधू निघाली, मात्र ती परतलीच नाही. सोबत दागिने घेऊन पसार झाली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद शिंपी यांनी नववधूसह वरील सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून भडगाव पोलिसांत भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार पांडुरंग सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज