भुसावळसह रावेर तालुक्यात सुरू होणार नव्याने रेशन दुकान; 20 नोव्हेंबर अर्जची अंतिम मुदत

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ ।  भुसावळ शहर व ग्रामीण भागात रेशन दुकाने सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीरनामा काढला आहे. त्यात शहरात 16, तर ग्रामीण भागात 10 अशी 26 नवीन दुकाने दिली जाणार आहेत. यासाठी 20 नोव्हेंबरपर्यत अर्ज करण्याची मुदत आहे. तसेच रावेर तालुक्यातील आठ गावांमध्ये नव्याने रेशन दुकाने सुरू होणार आहेत.

भुसावळ शहरासह तालुक्यात या गावांमध्ये नव्याने होणार दुकान

भुसावळ शहरात रेल्वे एम्प्लॉइज कंझ्युमर्स सोसायटी दुकान क्रमांक 4 व 5, सीआरएमएस दुकान क्रमांक 7, भुसावळ तालुका शेतकी संघ दुकान क्रमांक 8, जे.एन.माखिजा दुकान क्रमांक 18, आर.डी.पाटील दुकान क्रमांक 19/2, के.बी.पाटील दुकान क्रमांक 26, एन.एस. माखिजा दुकान क्रमांक 37, जतन महिला बचत गट दुकान क्रमांक 44, एम.बी.पाटील दुकान क्रमांक 28, श्रमजिवी संघटना दुकान क्रमांक 33, जतन म.औ.सह संस्था दुकान क्रमांक 44, भोई नगर साकेगाव रोड, राहूलनगर, शांती नगर व शिवपूर कन्हाळा रोड, वरणगाव येथील आर. एन.चव्हाण, विल्हाळे, फुलगाव, बोहर्डी खुर्द, कंडारी 2, वराडसीम, आचेगाव, पिंप्रीसेकम, मन्यारखेडा, साकरी येथील दुकानांचे जाहीरनामे काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्जासाठी ऑनलाईनची व्यवस्था केल्याचे तहसीलदार दीपक धीवरे म्हणाले.

रावेर तालुक्यात आठ ठिकाणी नवीन दुकाने

शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी रास्त भाव दुकानांचे जाहीरनामे काढणेसाठी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर अशी आहे. रावेर तालुक्यातील शहरी भागातील सावदा येथील दोन स्वस्त धान्य दुकाने व ग्रामीण भागातील मंगरूळ, जुनोने, जुनी मोहमंडली, सावखेडे, चुनवाडे, सांगवे या गावातील स्वस्त धान्य दुकानाकरीता जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नोंदणीकृत संस्था, बचत गट, स्थानिक ग्रामपंचायती, सहकारी संस्था आदी यात सहभागी होऊ शकतात. रावेर तालुक्यातील पात्र अर्जदारांनी जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज