कोरोनाच्या नवीन विषाणूचा धसका : महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । परदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मोठा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार सावध झालं आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्याची गंभीर नोंद घेतली आहे. राज्यात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे.

बाहेरच्या देशात अनेक ठिकाणी करोना संसर्गाची चौथी लाट आली आहे. तरी भारताने करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखून धरल. मात्र दक्षिण आफ्रिकेत सापडलेला करोनाचा नवीन व्हेरियंट अत्यंत घातक असल्याचं बोलल जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालं आहे.

नवीन नियमावली

– सार्वजनिक वाहतूकीत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवास करण्यास मुभा

– सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश

– प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक

– महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण आवश्यक किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर रिपोर्ट बंधनकारक

– सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश

– दुकानात ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉल मालकाला ५० हजार दंड

– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड

– भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती

– खासगी वाहनात मास्क न घातल्यास प्रवाशाला आणि वाहन मालकास प्रत्येकी ५०० रुपये दंड

सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.

– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई

या देशांनी निर्बंध लादले

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 च्या नवीन स्वरूपाच्या आगमनाने अनेक देशांची चिंता वाढली आहे आणि त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या समितीने कोरोना विषाणूच्या या नवीन स्वरूपाला ‘ओमिक्रॉन’ असे नाव दिले आहे आणि त्याला ‘अत्यंत संसर्गजन्य चिंताजनक प्रकार’ असे म्हटले आहे. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार समोर आल्यानंतर युरोपियन युनियनसह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, रशिया आणि इतर अनेक देशांनी आफ्रिकन देशांतील लोकांच्या हालचालींवर बंदी घातली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -