fbpx

नेहरू युवा केंद्र, मराठी शाहीर परिषदेतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र जळगाव आणि अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेतर्फे शहरातील नेरी नाका येथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि लोकशाहीर परिषदेच्या सदस्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

नेहरू युवा केंद्र आणि मराठी शाहीर परिषदेतर्फे पोवाडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील, कोमल महाजन, दुर्गेश आंबेकर, रोहन अवचारे यांच्यासह अखिल भारतीय मराठी लोकशाहीर परिषदेचे विनोद ढगे, सचिन महाजन, अवधूत दलाल, सुदर्शन पाटील, दीपक महाजन, हनुमंत सुरवसे, कल्पेश नन्नवरे, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज