पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे यावर्षी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी युवा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप जिल्हास्तरावर 25 हजार, राज्यस्तरावर 75 हजार रुपये तर राष्ट्रीयस्तरावर अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि पन्नास हजार व प्रमाणपत्र असे आहे. विविध विषयांवर कार्य करणाऱ्या आणि नेहरु युवा केंद्र, जळगावशी संलग्न असलेल्या युवा मंडळानी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, अर्ज करण्याची मुदत १९ ऑक्टोबरपर्यत असून अर्जाचा नमुना नेहरु युवा केंद्र, जळगाव जिल्हा कार्यालय (जयहिंद कॉलनी, द्रौपदीनगर, जळगाव) येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी https://nyks.nic.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज