fbpx

पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना साज वाटप

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अनेक वर्षापासून आर्थिक, अस्मानी संकट निर्माण झाले आहेत. आता तर करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणखी संकटात सापडलेला आहे. येत्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी क्षेत्राविषयी व बळीराजाप्रती बांधिलकी म्हणून सुमीरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला.

हा अनोखा उपक्रम गेली ७ वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे करण्यात येत आहे.  उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि  पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत  नाही. त्यामुळे  शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले.

प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आ. सुरेश भोळे, चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक संजय गांधी, नेहरू चौक मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह शेतकरी रवींद्र गणपत पाटील हे उपस्थित होते. सुरुवातीला आ. सुरेश भोळे यांनी, आमची शेती, आमची माती, पिकवू येथे माणिक मोती या जिद्दीने आज भारतीय शेतकरी प्रगती करत आहे. शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी महत्वाची असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. आ. लताताई यांनी, बळीराजा देशाचा पोशिंदा असून त्याला वंदन करून आपण मदत केली पाहिजे असे सांगितले.

यानंतर शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लटी, गेठा असा पोळ्याचा साज पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी शेतक-यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी  प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही  पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. म्हणून त्याला आधार देणे गरजेचे आहे. हे काम आपणच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून करू शकतो, असे म्हटले.

प्रकाश आडते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्रसंगी रिकेश गांधी, पियुष गांधी यांच्यासह  पंकज पाटील, रोहित शिरसाठ, दर्शन बारी, वैभव जगदाळे, धनंजय अमोदकर, प्रसाद विसपुते, शेखर सोनवणे, ऋषभ गांधी, चेतन माळी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

या शेतकऱ्यांना मिळाला लाभ

कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पोळ्याचा साज वाटप करण्यात आला. यात दीपक वानखेडे,पांडुरंग नारखेडे, बळीराम अत्तरदे, पिंटू काटे, भूषण धनगर, राकेश बारेला, विलास पाटील, समाधान पाटील, राजू पाटील, नाना पाटील, राहुल सावळे, नरेंद्र सावळे, प्रदीप चौधरी, भारत कांचाने, नितीन चौधरी, बळीराम बारेला, उमेश पाटील, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर हरणकर, भगवान शिंदे, समाधान पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र शिरसाठ, बबलू बारी आदी शेतकऱ्यांना साज वाटप झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज