fbpx

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ग्राम रोजगार सेवक संघटनेला पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । पंचायत समिती यावल येथे आज शनिवारी ग्राम रोजगार सेवक संघटना यांचा एक दिवसीय लक्षणिय उपोषण होते. या उपोषणास राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ग्राम रोजगार सेवक यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे संचालक गिरीश पाटील, तालुका सरचिटणीस योगेश पाटील यांच्यासह आदींची याप्रसंगी उपस्थिती होती

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज