fbpx

19 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची यावलला बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगावतर्फे निर्धार केलेल्या संपर्क अभियानाची यावल  येथे आढावा बैठकीचे आयोजन यावल कृषी उत्पन्न बाजार समतीतिच्या सभागृहात शनिवार १९ जून रोजी करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदअधिकारी कार्यकर्ते तसेच युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शनिवार १९ जून रोजी आयोजित महत्वाच्या बैठकीसाठी प्रामुख्याने उपस्थित राहावे असे आवाहन युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील व शहर युवक अध्यक्ष हितेश गजरे यांच्यासह आदी पक्षातील पदाधिकारी यांनी केले आहे.

mi advt

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवारचे कृषी, शिक्षण, सहकार, आर्थिक व क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्राविषयीचे विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत, विशेषतः जिल्ह्यातील युवकांपर्यंत पोहचावेत व हा युवा वर्ग जास्तीत जास्त प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसशी एकरूप व्हावा या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगावतर्फे जिल्हाभरात संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी यावल कार्यकारिणीसोबत नियोजन व आढावा बैठक जिल्ह्या युवक अध्यक्ष व  निरीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज