बंगळुरू प्रकरणाचा अमळनेरात राष्ट्रवादीतर्फे निषेध

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे घडली. याचा निषेधार्थ अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक करण्यात आला.

बंगळुरू येथे घडलेल्या या प्रकाराचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमळनेरात देखील संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री शिवाजी महाराज उद्यानात एकत्रित येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी सुरू केली, या घटनेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधातही जोरदार निदर्शने करून छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यावेळी दीपक पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक केला तर शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी पाण्याने पुतळा स्वच्छ केला. यानंतर बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील व शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्रा.मंदाकिनी भामरे, के.आर शेख, नगरसेवक विवेक पाटील, यदनेश्वर पाटील, रणजित भीमसिंग पाटील, गोविंदा पाटील, ईश्वर खंडू बैसाणे, सुनिल शिंपी, सनी गायकवाड, देविदास देसले,इम्रान खाटीक, रिपब्लिकनचे बैसाणे, यतीन पवार, अशोक पाटील यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

आमदारांनीही केला घटनेचा निषेध

आमदार अनिल पाटील यांनी देखील या घटनेबाबत प्रखर भावना व्यक्त करताना निषेध व्यक्त केला असून वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देखील लक्ष करत जनता माफ करणार नाही असे म्हणून त्यांचाही निषेध केला आहे.

हे देखील वाचा :बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -