गिरीश महाजन यांनी आत्मपरीक्षण करावे.. राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री सतीश पाटील यांनी टोला लगावला आहे. खासदार रक्षा खडसे आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना फसवलंय. निवडणूक प्रक्रियेविरुद्ध बोलण्याऐवजी गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे, असा टोला सतीश पाटील यांनी केलाय.

भाजप खासदार रक्षा खडसे आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांना फसवलंय. दोघींनी जाणीवपूर्वक अर्ज अपूर्ण ठेवल्यानं त्यांचे अर्ज बाद झाले. रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवायची असेल त्यामुळे त्यांनी महाजन यांच्या आदेशानं अर्ज दाखल केले असतील, असं सतीश पाटील म्हणाले.

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचा असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने रक्षा खडसे यांनी जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, रक्षा खडसे यांना जिल्हा बँकेत उभारण्याची हिम्मत नव्हती म्हणून जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज