…तेव्हा हा कळवळा कुठे गेला होता?, रोहिणी खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भाजपला ओबीसींच्या या विषयावरून चांगलेच फटकारले आहे. ऍड.रोहिणी खडसे यांनी याबाबत ट्वीट करुन भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.

ओबीसींच्या विषयावरून भाजप सध्या सकारात्मक भूमिका घेत असून ऍड.रोहिणी खडसे यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करीत भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? … आता गळा काढण्यात अर्थ नाही अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज