fbpx

ब्रेकिंग ! राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलीक यांचे निधन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ – राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलीक यांचे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जळगाव जिल्हा आणि राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे चांगलेच वर्चस्व होते. आपल्या भाषणात विविध उदाहरणे आणि शेरोशायरीने ते अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. गफ्फार मलीक यांच्या जाण्याने जळगावची मोठी हानी झाली आहे.

अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी दिनांक २५ मे रोजी दुपारी २ वाजता मुस्लिम कब्रस्थान येथे होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज