⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | भाजप प्रवेशाच्या चर्चांना एकनाथ खडसेंनी दिला पूर्णविराम, काय म्हणाले वाचा..

भाजप प्रवेशाच्या चर्चांना एकनाथ खडसेंनी दिला पूर्णविराम, काय म्हणाले वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । मागील काही दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एकनाथ खडसेंनी यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली असल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता त्यामुळे खडसे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु खडसे यांनी भाजपात (BJP) जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असं ठाम उत्तर एकनाथ खडसेंनी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते बुलढाण्यात (Buldhana) बोलत होते.

एकेकाळी भाजपचे दोन खासदार असताना भाजपला हिणवलं जायचं. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीने पक्ष वाढवला. तर बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.