fbpx

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी बारामतीपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असतो. 

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण हे गेल्या १३ वर्षांपासून अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित करीत असतात.

या ही वर्षी ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी हॅण्डबुकची तेरावी आवृत्ती गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रकाशित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कार्यालय सचिव संजय चव्हाण, अजय बढे, दिलीप चव्हाण, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज