जिल्हा बँकेतील नवनियुक्त संचालकांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवड झालेल्या नवनियुक्त संचालकपदी निवड झालेल्या सदस्यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार करण्यात आला.

सविस्तर असे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकर्तीच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या सदस्यांना मोठे यश मिळविले आहे. त्यानिमित्ताने शनिवार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झालेल्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी माजी आमदार डॉ. सतिश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, रोहिणीताई खडसे खेवलकर, संजय पवार, घनश्याम अग्रवाल यांच्यासह अन्य सदस्यांची मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती 

याप्रसंगी विधानसभेचे माजी सभाध्यक्ष अरूणभाई गजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतिश पाटील, जिल्हा बँकेचे नवनियुक्त संचालक संजय पवार, धरणगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हाबँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहिणीताई खडसे, माजी आमदार मनिष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, विलास पवार, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar