राष्ट्रवादीतर्फे दिव्याग, अपंग बांधवांना मिठाई वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने भजे गल्ली येथील संत गाडगेबाबा निराधार निवारा केंद्र येथे वृध्द, दिव्यांग व अपंग बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली.

दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना गोरगरीब, निराधार वृद्ध या आनंदापासून वंचित राहू नये, उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने संत गाडगेबाबा निवारा केंद्र येथील सर्व वृद्ध आजी, आजोबा व शहरातील दिव्यांग, अपंग बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली. आरोग्यविषयक किंवा इतर कुठलीही समस्या असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव निराधार वृद्ध, दिव्यांग व अपंग बांधवांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी दिले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, वाल्मिक पाटील, मझर पठाण, वाय.एस. महाजन, सुदाम पाटील, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, अकील पटेल, अनिल पवार, नईम खाटीक, जितेंद्र बागरे, योगेश लाडवंजारी, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज