यावल तालुक्यातील खेड्या-पाड्यावर बस सेवा सुरू करा : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । कोरोनामुळे बंद असलेली ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष राकेश सोनार यांनी यावल आगाराचे डेपो मॅनेजर एस. व्ही.भालेराव यांना निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोनाची परिस्थिती तालुक्यात बर्या पैकी आटोक्यात आल्याचे दिसत आहे. त्याच प्रमाणे शाळेत व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी ग्रामीण भागातून शहरात येण्याच्या करीता मोठी अडचण निर्माण होत आहे.

म्हणून ज्या प्रमाणे आपण आंतरजिल्हा नंतर आंतरराज्य बस सेवा सुरू केली त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करावी हि विनंती तालुकाअध्यक्ष राकेश सोनार यांनी निवेदनातून केलेली आहे. त्यावेळी डेपो मॅनेजर एस. व्ही. भालेराव यांनी सोमवारपासून ग्रामीण भागात बस सेवा सुरू करणार असे आश्वासन राकेश सोनार यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरउपअध्यक्ष शरीफ तडवी, कार्याध्यक्ष महेंद्र तायडे, सुनिल इंगळे, जय अडकमोल, गणेश बडगुजर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -