fbpx

चाळीसगाव खड्डेमय झाल्याने राष्ट्रवादीचे गावभर ढोल बजाव आंदोलन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव शहरातील रस्त्याच्यां प्रचंड दुरावस्थेला जबाबदार धरून नगरपालिकेतील झोपेचे सोंग घेणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कचेरी पासून ढोल वाजवत पायी नगरपालिकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आघाडीचे नगरसेवक यांनी ढोल आंदोलन केले.

चाळीसगाव शहरात गेल्या चार वर्षात नगरपालिकेने शहरातील नागरीकांच्या जीवाशी खेळ मांडला असुन शहराची अतिशय दुरावस्था झालेली असून त्यामुळे शहरातील नागरीक माता, बंधु , भगिनीनां मानसिक त्रास सहन करावा लागतोय. म्हणून या सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला जागृत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत ढोल बजाव आंदोलन आज सकाळी10:30 वाजता सुरू करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, चाळीसगाव शहर व चाळीसगाव तालुका तसेच लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज