fbpx

आठवी-दहावी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; १५०० पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

mi-advt

आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. नॉर्दर्न कोलफिल्डस लिमिटेड (NCL)ने अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. एकूण १५०० जागांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांना अर्ज करण्यासाठी तुम्हाला एनसीएलची ऑफिशियल वेबसाईट nclcil.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

अर्ज भरण्याची, निवेदन करण्याची शेवटची तारीख ही 9 जुलै 2021 अशी आहे. यात निवड झालेल्यांना नॉर्दर्न कोलफिड्स लिमिटेडमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच ज्यांना कुणाला या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी तातडीनं nclcil.in या साईटवर जाऊन करावा.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वेल्डर/ Welder १००

२) इलेक्ट्रीशियन/ Electrician ५००

३) फिटर/ Fitter ८००

४) मोटार मेकॅनिक/ Motor Mechanic १००

शैक्षणिक पात्रता : ०८ वी परीक्षा उत्तीर्ण व १० वी परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. किंवा एस.सी.व्ही.टी. यांच्याकडून वेल्डर/ इलेक्ट्रीशियन / फिटर/ मोटार मेकॅनिक ट्रेड प्रमपत्रासह उत्तीर्ण ५०% [SC/ST – ४५%].

वयोमर्यादा : ३० जुलै २०२१ रोजी १६ वर्षे २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी होईल, कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच नियुक्ती होईल.

जाहिरात (Notification) :  PDF

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt