प.वि. पाटील विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्याची ओळख करून दिली व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील, दिपाली चौधरी, अशोक चौधरी, धनश्री पालक, कल्पना तायडे, स्वाती पाटील, सूर्यकांत पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज