ए.टी. झांबरे विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला.

सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सी.बी.कोळी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शिक्षण विषयी विचार मांडले तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे कशाप्रकारे शिक्षण घेतले पाहिजे, ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव कसा होतो याविषयावर विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेतले.

चैतन्या सपकाळे, पायल थोरात, कनिष्का चौधरी, कृष्णगिरी गोसावी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतिश भोळे, एस.एच. बावस्कर, डी.ए. पाटील, प्रतिभा लोहार, वर्षा राणे, पूनम कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज