fbpx

समस्यांनी नशिराबादकर हैराण; नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासकाची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । जळगाव तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासक नसल्याने गावातील समस्या सोडविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये झाले आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहेत. पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील वार्डांमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. गटारींची अस्वच्छता वाढत आहे. साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहेत. बसस्थानक चौकातील हायमस्ट लॅम्पसह गावात पथदीवे बंद आहेत. पावसाळ्यात सहाव्या-सातव्या दिवशी दूषित पाणीपुरवठा होत आहे. नियोजना अभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. त्यामुळे मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्णवेळ प्रशासक मिळावा व समस्या त्वरित सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन दि.५ ऑक्टोबर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले. यावेळी प्राध्यापक विश्वनाथ महाजन यांनी गावातील विविध समस्यांवर उपजिल्हाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली.

mi advt

निवेदन देतेवेळी स्वयम् शोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे, सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बारूदवाले, सागर मोरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज