fbpx

…अन्यथा टोलनाका चालू देणार नाही : मनसेचा इशारा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । जळगाव – भुसावळ महामार्गावर सुरु करण्यात आलेल्या टोलनाक्यावर स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अन्यथा टोलनाका चालू दिला जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज देण्यात आला.

टोलनाक्यावर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज बुधवार दि. १५ रोजी टोलनाका संचालकांना देण्यात आले. दरम्यान, आठ दिवसाच्या आत स्थानिक भूमिपुत्रांना न घेतल्यास टोलनाका चालू देणार नाही असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आठ दिवसाच्या आत स्थानिक भूमिपुत्रांना घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी मनसेचे जळगाव तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे, भुसावळ शहर अध्यक्ष विनोद पाठक, जितेंद्र बराटे, तेजस कोळी, निखील पाटील, प्रीतम चौधरी, सचिन भालेराव, गजेंद्र माळी, रवी मस्कर, अमोल माळी, श्रीकांत कदम, वासुदेव कुरकुरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज