काँग्रेसचे आमदार डॉ.सुधीर तांबे महापौरांच्या भेटीला

काँग्रेसचे आमदार डॉ.सुधीर तांबे महापौरांच्या भेटीला

जळगाव, दि.३० – शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांची नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे आ.सुधीर तांबे यांनी राहत्या घरी सदिच्छा भेट घेतली.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे हे बुधवारी जळगावात आले असता त्यांनी महापौर जयश्री महाजन यांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. प्रसंगी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माध्यमिक शिक्षक पतपेढी अहमदनगरचे अध्यक्ष चांगदेव खेमनार, छोटू खडके आदी उपस्थित होते.

आ.तांबे यांनी महापौरांचे स्वागत करून अनेक विषयांवर चर्चा केली. महापौर आणि आमदार दोन्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने शिक्षण क्षेत्राविषयी बऱ्याच गप्पा त्यांनी केल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज