fbpx

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नामदेवराव चौधरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ ।  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी जळगाव येथील नामदेवराव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली.

चौधरी यांनी जळगाव शहराचे महानगर अध्यक्षपद भूषविले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत फेरबदल होत आहेत. प्रदेश पातळीवरून संघटनेतील रिक्त पदांवर विविध नियुक्त्या केल्या जात आहेत.

जळगाव शहराचे माजी महानगर अध्यक्ष नामदेवराव चौधरी यांची मुख्य संघटनेत प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी चौधरी यांच्यावर जबाबदारी सोपवली. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील संघटनात्मक संपर्काची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज