गळफास घेऊन नायगावच्या तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात आत्महत्या करण्याच्या प्रमाणात खूपच वाढले आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालले आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील नायगाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली आहे. मिलींद उर्फ भिका गल्लु कोळी (वय२८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, नायगाव येथील मिलींद कोळी हा ट्रॅक्टर चालक आहे. आज सकाळी त्याने  राहत्या घरातील छताच्या साडी बांधुन गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली आहे.मयत भिका कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

या अविवाहीत तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. चंद्रकांत सुखदेव कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar