fbpx

चौफुलीवर लूटमार करणारे दोघे जाळ्यात, सफरचंद बॉक्ससह मोबाईल हिसकावला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । नाहाटा चौफुलीवर लक्झरीची वाट पाहत उभ्या असलेल्या दोघांना चारचाकीतून आलेल्या दोघांनी दमदाटी करीत त्यांच्याकडील तीन सफरचंदाचे बॉक्स, तीन हजारांची रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावल्याची घटना रविवारी रात्री ११.३० वाजता घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर डीबी गुन्हे शाखेने दोघा आरोपींना अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे अभिषेक राजेश शर्मा (23, रा. चमेली नगर) व रीत्तीक नरेश चौधरी (22, रा.पंचशील नगर, भुसावळ) अशी आहेत.

कट मारल्याच्या कारणावरून रस्त्यावर लुटली रोकड
तक्रारदार शेख इद्रीस शेख ईकबाल (रा.ग्रीन पार्क, भुसावळ) व मोहम्मद व हमाल दिनेश असे सुरतला लक्झरीने सफरचंद पाठवण्यासाठी अ‍ॅपे रीक्षा घेवून नाहाटा चौफुलीवरील एम.जे.ट्रॅव्हल पार्किंगजवळ रोडच्या उभे असताना चारचाकीतून आलेल्या दोघांनी कट मारला व पुन्हा माघारी येत तुम्ही रस्त्यावर का बसले आहात म्हणून शिवीगाळ करीत सफरचंदाचे तीन बॉक्स तसेच मोबाईल फोनसह तीन हजारांची रोकड हिसकावली. रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तक्रारदाराने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.

दोघांना केली अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीतांना भुसावळातील वांजोळा रोड भागातून सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल दिनेश कापडणे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, जीवन कापडे आदींच्या पथकाने केली. तपास सहा पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज