fbpx

नागवेल प्रतिष्ठानतर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । नागवेल प्रतिष्ठान जळगाव खान्देश बारी समाजतर्फे ११ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय बारी समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सुचनेनुसार व आदेशानुसार होणार असून या मेळाव्याच्या निमित्ताने बारी समाज उपवर वधू-वर सूची-२०२१ चे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले फॉर्म मयुरेश टाईम्स्, आनंदा बारी, तेली चौक विठ्ठल पेठ जुने जळगांव, विजय बारी, बालाजी फोटो, अतुल डेअरी प्रिंप्राळा, भुषण बारी हरीविठ्ठल नगर व समस्त बारी पंच मंडळ अथवा युवक मंडळांकडे दि.३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जमा करावेत, असे आवाहन अध्यक्ष प्रा. नितिन बारी, लतिश बारी, अतुल बारी, भरत बारी, विनोद लावणे, योगेश बारी, नितिन बारी, सुशिल बारी, कमलेश बारी यांनी केले आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज