fbpx

नागरी सहकारी बँकांच्या कर्ज ओटीएसला ‘या’ तारखेपर्यंतची मुदतवाढ

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । नागरी सहकारी बँकांची ३१ मार्च २०१९ अखेरची जी कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा बुडीत वर्गवारीत समाविष्ट आहे, अशा सर्व खात्यांना कर्जफेडीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेला सहकार विभागाने ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त व सहकार निबंधकांनी शासनास शिफारस केल्यानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. बँकांचा वाढता एनपीए कमी करण्यासाठी वेळोवेळी ही मुदतवाढ मिळाली.

नागरी सहकारी बंंॅकांच्या थकबाकीदारांना या योजनेत सहभागी करुन थकीत कर्जखाती बंद करुन बँकांचा ताळेबंद सुधारण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. नागरी सहकारी बँकांच्या संशयित किंवा बुडीत कर्ज खात्यांना ही योजना लागू आहे. त्याचप्रमाणे ३१ मार्च अखेर जी कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या सब स्टॅन्डर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्ज खात्यांना देखील लागू होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt