माझे ध्येय सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण झालेले दिसेल : आ. अनिल पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । अमळनेर शहरातील पिंपळे व ढेकू रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ७, ८, १३ व १४ मधील परिसर तसेच येथील संपूर्ण कॉलन्यांमधील प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत चकचकीत रस्ते हवेत, हेच माझे ध्येय आहे. माझे हे ध्येय सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण झालेले दिसेल, असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ८ मधील स्वामी विवेकानंद नगर आणि आल्हाद नगर, श्रीकृष्ण कॉलनीतील ट्रिमिक्स रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, कृउबाच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मार्केटचे प्रशासक एल.टी. पाटील, प्रा.सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

या प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. चेतना पाटील व अ‍ॅड. यज्ञेश्वर पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन आमदारांनी रस्ते मंजूर केले आहे. यावेळी आमदारांनी नागरिकांच्या समस्या ही जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी प्रभागातील प्रा. वंदना पाटील, विठ्ठल पाटील, एम.आर. पाटील, मधुकर शिरसाठ, प्रा.अशोक पवार, भागवत गुरुजी, अ‍ॅड. प्रशांत संदानशिव, रमेश पाटील, संभाजी पाटील, प्रा.अशोक पाटील, अनंत भदाणे, विलास दोरकर, लोटन पाटील, एस.एन. पाटील, दिलीप पाटील, बी.आर. पाटील, बी.एन. पाटील, दीपक सोनवणे, आरिफ पठाण, गणेश पाटील, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, शुभम बोरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.ए. धनगर यांनी केले तर आभार अनंत भदाणे यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज