सावदा पालिकेतर्फे “माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब” लसीकरण मोहीम सुरु

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । सावदा नगरपालिका व सावदा ग्रामिण रूग्णालय यांच्या संयुक्तिक विद्यमाने कोविड १९ लसीचे प्रथम व द्वितीय डोस न घेतलेल्या नागरिकांसाठी “लसिकरन आपल्या दारी” विशेष मोहिम १० तारखेपासून राबविण्यात येत आहे.तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन सावदा पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.

ही मोहीम १० रोजी सकाळी ख्वाजानगर,उर्दू शाळा परिसर,शेखपुरा,रविवार पेठ सावदा येथे तर दुपार व संध्याकाळळी आंबेडकर नगर,काझीपुरा,मदिना नगर,जमादार वाडा परिसर सावदा या भागात “माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब” लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय सावदा येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विशेष लसीकरण सत्रचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन सावदा पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -