fbpx

कोरोनाने मृत्यू : स्मशानभूमीत मृतदेहाला शेवटचा हात मुस्लिम तरुणांचा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । (विजय बाविस्कर) । जगात सर्वात श्रेष्ठ धर्म माणुसकी असतो. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी काहीजणांना माणुसकीचा विसर पडला आहे. आजची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, कुटुंबातीलच एखादा व्यक्ती मयत झाला तर त्याला हात लावण्यासही कुणी धजावत नाही. प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा वाटत असताना पाचोऱ्यात मात्र माणुसकीचा नवा पायंडा रचला जात आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करताना हिंदू तरुणांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम तरुण शेवटचा हात लावत आहे.

‘उपरवाले ने एक अच्छी चीज बनाई थी इंसान, लेकिन नीचे देखा तो सब कीड़े बन गये कीड़े’ क्रांतिवीर चित्रपटातील या डायलॉगमध्ये सांगिलेला ‘इन्सान’ आज कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने बेजार झाला आहे. काय करावे, कुठं जावे, कसे जगावे हे कुणालाही कळत नाही. कुठे कोरोनात माणुसकी वेशीवर टांगत बाजार मांडला आहे तर कुठे चांगली माणसं माणुसकीला जागत जनसेवा करीत आहे. भीतीदायक परिस्थिती आणि शासनाच्या नियमावलीने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाला कुणीही हात लावण्यास धजावत नाही. इच्छा असूनही आपला जवळचा एक गेलाय दुसराही गमावून बसू या अनामिक भीतीपोटी दुरून अंतिम दर्शन घेतले जाते.

पाचोरा शहरात गेल्या वर्षभरापासून तरुणांचा एक गट जात, धर्म, पंथ विसरून स्मशानभूमीत येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाच्या अंतिम विधी पार पाडत आहे. उपरवाला नेक हैं, हम उसके बंदे हैं। करनेवाले हम हैं लेकिन करवानेवाला उपरवाला हैं। या तत्वाला अनुसरून हिंदू बांधवांच्या स्मशानभूमीत ३ मुस्लीम तरुण कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारचा धर्म निभावत आहे. एकीकडे ज्या जात, धर्माच्या मुद्द्यावर दंगली भडकविल्या जातात त्याच देशात पाचोऱ्याच्या तरुणांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. पाचोरा स्मशानभूमीत विजय बाबूलाल भोई व रामा हिरालाल चौधरी हे अंत्यविधीसाठी सहकार्य करीत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनामुळे मृत्यू पावलेले तसेच संशयीत रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्मशानभूमीत हिंदू तरुणांच्या मदतीला खांद्याला खांदा देत जावेद शेख, तौसिफ शेख, हकीम शेख, सलीम इरफान शेख हे मदत करीत आहे.

स्मशानभूमीत कोरोना आणि इतर आजार, आकस्मिक मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या सर्व तरुणांना पीपीई किट प्रशासनाने दिलेले नाही. पीपीई किट नसले तरीही मास्क, रुमाल वापरून सर्व प्रकारची खबरदारी घेत तरुण अंत्यसंस्काराची भूमिका बजावत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज