fbpx

पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून हत्या, शालक जखमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ ।  पाळधी येथील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा कौटुंबिक वादातून पतीने चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पतीने शालकावर देखील वार केले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाळधी येथील मारवाडी गल्लीतील माहेर असलेल्या पूजा सुनिल पवार यांचे जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथील सासर आहे. बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पती सुनील बळीराम पवार हा पाळधी येथे गेला. कौटुंबिक वादातून त्याने पत्नी पूजा पवार आणि शालक शंकर भिका चव्हाण यांच्यावर चाकूने वार केले. 

पूजा या जखमी होताच त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुनील पवार स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. जिल्हा रुग्णालयात मयतेचे नातेवाईक जमले असून एकच आक्रोश केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज