fbpx

धक्कादायक : आतेभावाकडून मामेभावाचा खून, डांभूर्णीतील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । आतेभाऊ आणि मामेभावात घरगुती वादातून झालेल्या  मारहाणीत  एकाचा खून झाल्याची घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे आज शुक्रवारी घडलीय. तान्या लोटन बारेला असे मृताचे नाव असून या घटनेबाबत परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या संदर्भात उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, डांभूर्णी येथील आदीवाशी वस्तीतील रहिवासी तान्या बारेला व त्याचा आतेभाऊ अखिलेश बळीराम बारेला ( वय ३६ वर्ष) यांच्यात घरगुती वाद झाला. त्याचे रुपांतर मारहाणीत झाल्याने त्यात अखिलेश बारेला याने लाकडी दाडुक्याचा वापर करुन तान्या बारेला याला मारहाण केली. यात तो मृत झाला.

mi advt

या घटनेची माहीती पोलिस पाटील यांनी पोलिसांना कळवताच यावल पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व त्यांचे सहकारी गणेश ढाकणे, सतीश भोई, विजय परदेशी आदी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन तान्या बारेलाचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास करतांना संशयीत आरोपी अखीलेश बारेला यास दारुच्या नशेत घरातुन पकडून यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज