fbpx

भुसावळात सुनेकडून सासूचा खून

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । मनोरुग्ण असलेल्या सुनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर विळा मारून खून केल्याची घटना शहरातील प.क.कोटेचा महिला शाळेजवळ बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

द्वारकाबाई सोनवणे (75) असे मयत महिलेचे नाव असून शहर पोलिसांनी संशयीत म्हणून उज्वला सोनवणे (38) या महिलेस ताब्यात घेतले आहे. खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत असे की, शहरातील गजानन महाराज नगर भागातील श्रीमती पद्माबाई विद्यालय प्राथमिक व बालवाडी विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय येथे गेल्या  8 वर्षापासून सिक्युरिटी गार्ड म्हणून  नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे व त्यांचा परिवार राहत आहे  त्यांची पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांचे दिनांक ३/६/२०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हा किराणा दुकानावरती माल खरेदी करण्यासाठी गेला असता त्यादरम्यान  उज्वला रविंद्र सोनवणे यांची व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला तो विकोपास गेला त्यात मणोरुग्ण सुन  उज्वला सोनवणे यांनी धारदार शस्त्र विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार मारल्याची घटना सायंकाळी  घडली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे परी.डी वाय एस पी.नितीन गणापुरे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सपोनि संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी उपस्थित होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून सुनेला ताब्यात घेतले असून ती मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज