जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खून, डोकं ठेचून हत्त्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । शहरात रविवारी सकाळी भर रस्त्यावर मुलांनी बापाचा खून केल्याचा प्रकार घडल्यानंतर सोमवारी पहाटे पुन्हा एक खुनाचा प्रकार समोर आला आहे. जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोकं ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

जुना जळगाव परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणारे राजू पंडित सोनवणे वय-५५ यांचा ३० वर्षांपूर्वी रजिया सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. १५ वर्षांपासून दोन्ही पती-पत्नी आणि २ मुले असे लक्ष्मी नगरात स्थायिक झाले होते.

राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. आंबेडकर वाड्यासमोर राजू सोनवणे यांची आई व पुतण्या राहत असल्याने ते त्यांना भेटायला येत होते. रविवारी रात्री देखील ते आईला भेटायला आले आणि रात्री तिथेच थांबले.

रात्री राजू यांची आई द्रुपदाबाई आणि पुतण्या विशाल अनिल सोनवणे असे घरी होते. राजू सोनवणे रात्री घराच्या वरील मजल्यावर झोपायला गेले तर आई व पुतण्या खालील खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजले तरी राजू सोनवणे खाली न आल्याने त्यांनी एक मुलाला वर पाठविले असता त्याला घडलेला प्रकार लक्षात आला.

राजू सोनवणे यांचे डोकं ठेचून हत्त्या करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -