fbpx

भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरलं : तरूणाचा चेहरा दगडांनी ठेचून हत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरलं आहे.  शहरातील जामनेर रोडवरील श्रध्दा कॉलनीजवळील  गजानन महाराज मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर एका तरूणाचा  खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

या तरूणाची ओळख मिटवण्यासाठी चेहरा दगडांनी ठेचून टाकण्यात आला आहे. मयत तरूणाचे वय हे सुमारे ३5 ते 40 च्या आसपास आहे. पहाटे या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान येथे तरुणाचा खून कोणी व का केला? या कारणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून अज्ञात मारेकर्‍यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज