fbpx

भुसावळ पुन्हा हादरले : डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्त्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । भुसावळ शहर पुन्हा एकदा तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील पंजाबी मशीद परीसर, आगवाली चाळ परीसरात एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुनील अरुण इंगळे असे मयताचे नाव असल्याचे समजते.  या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली.

याबाबत असे की,  शहरातील पंजाबी मशीद परीसर, आगवाली चाळ परीसरात आज सकाळी पत्र्यांच्या खाली एक मृतदेह आढळून आला. आज सकाळी याबाबतची माहिती उघडकीस आल्याने खळबळ उडाली. खुनाची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या वादातून वादातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे.

mi advt

दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.  काही दिवसांपूर्वी याच रोडवर पुढे एकाची हत्या झाली होती. यानंतर पुन्हा एकदा खून आणि तो देखील पोलीस चौकीच्या जवळच झाल्याने खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज