fbpx

अमळनेर हादरले : पैशाच्या वादातून तरुणाची गळा चिरून हत्त्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । पैशाच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या हशमजी प्रेमजी व्यापारी संकुलात आज शुक्रवारी पहाटे घडली. प्रकाश दत्तू पाटील (वय ३५, रा. गांधलीपुरा, अमळनेर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला.

याबाबत असे कि, हशीमजी प्रेमजी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आज पहाटे प्रकाश पाटील या तरुणाचा पैशाच्या वादातून खून करण्यात आला. सकाळी सफाई कामगार झाडलोट करण्यासाठी गेले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेचे वृत्त कळताच रजेवर असलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, अवघ्या तीन तासात पोलिसांनी हा खून कैलास पांडुरंग शिंगाणे याने केल्याचे निष्पन्न केले. आरोपी कैलास फरार झाला असून त्याच्या कुटुंबियांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज