भुसावळ पुन्हा खुनाने हादरले! महिलेचा निर्घृण खून

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले आहे. एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुचित शुभम बारसे (32, रा.कवाडे नगर, भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे.

निर्जन जागी केला खून
शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा शहरातील 32 वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीने महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार करून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जनजागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी
महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -