fbpx

अनैतिक संबंधाच्या संशयावरून सावखेड्यात तरुणाचा खून ; मारेकरी पोलिसांच्या स्वाधीन

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात काही महिन्यापासून खून, गोळीबार, चोऱ्यांचे घटना वाढत असून पोलिस प्रशासनाने देखील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केली आहे. परंतू रात्री जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात पून्हा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सावखेडा येथील तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

श्रावण लालचंद भिल उर्फ सोनवणे (वय ४०) असे मयताचे नाव असून भैय्या मदन पावरा (वय २८) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाला असून मारेकरी हा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

mi advt

मिळालेल्या माहितीनूसार सावखेडा गावातील श्रावण सोनवणे यांचे पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशया मदन पावरा याला होता. त्यामुळे श्रावण याचा काटा काढण्यासाठी तीन दिवसापूर्वी पत्नीला व सासूसोबत गावाला पाठवून दिले होते. बुधवारी रात्री श्रावण भिल व भैय्या हे दोघी दारू पिण्यास बसले आणि त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि भैय्या पावरा याने श्रावण याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यात श्रावण यांचा जागीच मृत्यू झाला.

संशयीत भैय्या पावरा हा पोलिस पाटील उत्तम दगडू चौधरी यांच्याकडे एक वर्षापासून कामाला होता. त्यातच त्याने खून श्रावण याचा खून केल्यानंतर पोलिस पाटील यांच्याकडे येवून घटना सांगितली. पोलिस पाटील यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले.

रात्री घटना घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज