मुंबई-जळगाव बससेवा सुरू, पुणे बस फेऱ्या वाढविल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीचा सण सुरु झाला असून नागरिकांची बाहेरगावी जाण्याची लगबग सुरु आहे. मुंबई, पुणे येथून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून प्रवाशांची ही मागणी लक्षात एसटी महामंडळाने जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बससेवा सुरू केली आहे.

दिवाळीसाठी आपल्या गावाकडे येणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. पुणे येथे नोकरीनिमित्त गेलेल्या चाकरमान्यांची संख्याही मुंबईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे एसटी आगाराने पुणे येथे जास्त लक्ष्य केंद्रित केले आहे. पुण्यासाठी ७ बसेस पाठवण्यात आल्या आहे. यासह मुंबईसाठीही दोन बसेस पाठवल्या आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड व खडकी कंटोन्मेंट बोर्ड येथून बसेस जळगावकडे येताहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज