fbpx

मुक्ताईनगरात राणेंविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा मुक्ताईनगर येथील प्रवर्तक चौकात शिवसैनिकांनी जाळून निषेध व्यक्त केला.

जन आशीर्वाद यात्रेमध्ये नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द (कानशिलात लावण्याचे )वक्तव्य केल्यामुळे आज मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळ्याचे दहन करून प्रवर्तक चौकामध्ये नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला

प्रसंगी मुक्ताईनगर शहरातील शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते नारायण राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी याठिकाणी करण्यात आली, शिवसैनिक युवसैनिक,महिला आघाडी सैनिकांनी उपस्थिती दर्शविली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज