कुऱ्ह्यात दोन संशयितांची गावातून धिंड

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींची मंगळवारी दुपारी मुक्ताईनगर पोलिसांनी कुऱ्हा गावातील बाजारातून धिंड काढली. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा व जनतेची भीती दूर व्हावी, यासाठी मुक्ताईनगर पोलिसांकडून हे अभियान राबविण्यात आले.

मुक्ताईनगर तालुक्यासह कुऱ्हा काकोडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. दरोडा, हत्या, काळाबाजार, फसवेगिरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी व्यापारी संघटनांकडून मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक खताळ यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नागरिकांच्या मनात असलेली भीती कमी व्हावी, यासाठी कुऱ्हा परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील दोन संशियितांची धिंड काढली. पोलिस यंत्रणा कोणचीही दादागिरी, गुन्हेगारी खपवून घेणार नाही. कुठेही संशयित कृत्य किंवा समाजकंटकांकडून चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे कळल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज