मुक्ताई परिक्रमेचे फेब्रुवारीत प्रथमच आयोजन‎‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान‎ असलेल्या संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन‎ झालेल्या मुक्ताईनगरातून फेब्रुवारीच्या‎ पहिल्याच आठवड्यातून परिक्रमेला प्रारंभ‎ होणार आहे. रवींद्र हरणे महाराज यांच्या‎ संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे.‎

तिर्थक्षेत्र किंवा धार्मिक स्थळी एक विशेष‎ प्रकारची ऊर्जा व शक्ती निर्माण झालेली‎ असते. ही ऊर्जा मंत्र, अखंड नामोच्चार,‎ कथा, कीर्तन व भक्तांच्या अविरत वाहणाऱ्या‎ झऱ्यातून निर्माण झालेली असते. ती भूमी‎ यातूनच पुण्यभूमी म्हणून पुलकित झालेली‎ असते. जी व्यक्ती असे तिर्थक्षेत्र व धार्मिक‎ स्थळांची प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करतो‎ त्याला निसर्गाच्या प्रत्येक ठिकाणच्या शुद्ध व‎ मनाला प्रसन्न करणाऱ्या नैसर्गिक‎ ‎ वातावरणाचा, वनस्पतींच्या सुगंधाच्या‎ आयुर्वेदिक ऊर्जेचा लाभ होतो. ती ऊर्जा‎ आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते.‎ मुक्ताईनगर ही भूमी देखील मार्कंडेय ऋषी,‎ योगिराज चांगदेव महाराज, संत मुक्ताबाई,‎ संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज असे‎ संत-ऋषिमुनींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली‎ आहे. आदि शक्ती मुक्ताई याच भूमीत‎ संजीवन अंतर्धान पावल्या आहेत. आदि‎ शक्ती मुक्ताईच्या या भूमीला परिक्रमेचा मार्ग‎ असावा असा मनाशी संकल्प बांधून पालखी‎ सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराजांनी पुढाकार‎ घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून निघणाऱ्या‎ परिक्रमेचा मार्ग सुमारे ५० ते ६० किमी असेल.‎ पायी प्रवासात दोन दिवसांचा मुक्काम करून‎ परिक्रमा पूर्ण करता येईल. ही परिक्रमा‎ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा‎ त्यांचा मानस आहे.‎

संत मुक्ताईंची मूर्ती.‎

दरवर्षी आयोजनाचा मानस‎ तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर-कोथळीची परिक्रमा या मार्गातून‎ होणार आहे. भाविकांना अनन्य पुण्यसंचय करण्याचा योग‎ मिळेल. पुढे भविष्यात दरवर्षी या परिक्रमेचे आयोजन‎ करण्याचा मानस आहे. इच्छुकांनी भाविकांनी कोरोनाचे‎ नियम पाळून त्यात सहभागी व्हावे, रवींद्र महाराज, मुक्ताईनगर‎ असा असेल मार्ग‎ जुने मंदिर-वढवा फाटा-चांगदेव मंदिर, तापी-पूर्णा संगमावर‎ नावेत बसून संगमाचे दर्शन. पुढे पैलतीर असलेल्या‎ मेळसांगवे येथे सिद्धेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर परत‎ मेळसांगवे-पंचाणे गावातून मुंढोळदे-चिचफाटा मार्गे उचंदा‎ येथे पहिला मुक्काम. सकाळी पुरनाड फाटा-खामखेडा‎ येथून जुना कुंड रस्ता मार्गे पिंप्री आकराऊत-‎ सातोड-निमखेडी खुर्द येथे श्रावणबाळ टेकडीवरून‎ हरताळा येथे आगमन व मुक्काम व परतीचा प्रवास.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -