मुख्तार खान सेवानिवृत्त

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । जळगाव येथील पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले मुख्तार खान सफदरखान पठाण हे प्रदीर्घ काळ सेवा करू नुकतेच सेवा निवृत झाले आहेत. पोलीस मुख्यालय जळगाव येथे त्यांचा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्तार खान यांनी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यात पोलिस वाहतूक सेवा, जिल्हा पेठ, भुसावळ बाजार पेठ, रावेर पोलीस स्टेशन, अशा विविध ठिकाणी सेवा दिली आहे.

जळगाव येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार समारंभ पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंब, परिवारा सह उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -