fbpx

जळगावच्या मृणालिनी चित्ते ठरल्या WEAA ‘मिसेस इंडिया २०२१’

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । वुमन एक्सलेन्सी अचिवमेंट अवार्ड (विआ) यांनी आयोजित केलेला राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा ब्युटी पेजेन्ट विआ मिस अँड मिसेज इंडिया 2021 स्पर्धेचा अंतिम सोहळा नुकतेच जयपूर येथे पार पडला. स्पर्धेत जळगाव येथील मृणालिनी चित्ते यांनी बाजी मारली आहे.

नाशिक येथून ऑडिशन देऊन सिलेक्शन झाल्यानंतर या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहचलेल्या जळगावच्या मृणालिनी चित्ते यांनी प्रतिष्ठित व नामांकीत असा मिसेज गोल्ड केटेगरी, विआ मिसेज इंडिया २०२१ हा अवार्ड प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केला.
नाशिक, पुणे, नागपूर, दिल्ली बेंगलोर यासह संपूर्ण भारतामधून अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या ३५ सहभागी स्पर्धकांमधून सौ.चित्ते यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

mi advt

या स्पर्धेत वेस्टर्न, ट्रॅडिशनल, इंडोवेस्टर्न, स्पार्कल डिझायनर आऊटफिट्स थीम वर आधारित एकूण ३ राउंड झाले. फँशन सिक्वेन्स फायनल मधून टायटल क्राऊन करिता कॅटवॊक केले यामधून टॉप ५ महिलांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज शर्मा होते तसेच आयोजक हरीश सोनी, मॅनेजमेन्ट हेड ममता गर्ग यांच्या हस्ते अवोर्ड देण्यात आला.
नॅशनल लेव्हलला प्रतिष्ठेचा मिसेज इंडिया 2021 अवार्ड मृणालिनी चित्ते यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मृणालिनी चित्ते या धुळे येथील प्रोफेसर एम.जे.सोनवणे यांचा कन्या व जळगावातील प्रख्यात मनोविकारतज्ञ डॉ. प्रकाश चित्ते यांच्या पत्नी आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज