राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर ; जळगावातील ४७ विद्यार्थी उत्तीर्ण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा २०२० राज्यातील विविध केंद्रांवर २१ मार्चला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती. दरम्यान, या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील एकूण ४७ विद्यार्थी उत्तीण झाले आहे.

कोरोना संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं राज्य पूर्व परीक्षा २०२० परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केली होती. त्यानंतर आयोगाकडून ही परीक्षा २१ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात पार पडली होती. आता नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ४७ विद्यार्थी उत्तीण झाले आहे.

आता विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता
दरम्यान, २०० पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी ३ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -